सतेज चेहऱ्यासाठी कार्बन पील फेशियल ही आधुनिक तंत्रशुद्ध उपचार पद्धती

Posted by Meeraz Clinic
2
Jun 3, 2021
175 Views

चेहरा म्हणजे कोणत्याही व्यक्तीची पहिली ओळख. एखाद्या व्यक्तीचे नाव घेतले की पटकन त्याचा चेहरा आपल्या नजरेसमोर येतो. सर्वजण या चेहऱ्याची अत्यंत जाणीवपूर्वक दक्षता घेत असतात. चेहरा नेहमी उत्साही, आनंदी असेल तर इतरांवर त्याचा प्रभाव पडतो. नेहमी चेहरा धुताना साबण, फेसवाॅशचा वापर केला जातो. फ्रेशनेससाठी क्रीम फेसपावडरची जोड. काळजी घेऊनही काही कारणांमुळे चेहऱ्याच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. अशावेळी केवळ क्रीम्स वापरून क्षणिक उपाय करुन समस्या सुटत नाही. 'कार्बन पील फेशियल' हा सर्वांत उत्तम उपचार आहे. मुंबईतील त्वचा रोग तज्ञ ही प्रगत, सुरक्षित उपचार पद्धती सुचवतात जी त्वचा उपचार क्लिनिकमध्ये केली जाते. मुंबई अंधेरी वेस्ट येथील प्रसिद्ध त्वचा तज्ञ डाॅक्टरांची मिराज क्लिनिक मधील सर्वोत्तम कार्बन पील फेशियल ही चेहऱ्याला सतेज करणारी उपचार पद्धती अनेकांना लाभदायक ठरत आहे. चेहऱ्याची त्वचा नाजूक, संवेदनशील असल्याने धूळ, प्रदुषित हवा, उष्णता, घाम या सर्व घटकांचा दुष्परिणाम त्यावर होतो. चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते. काळसर होते. पुरळ उठतात. चेहऱ्याचा तजेलदारपणा कमी होऊ लागतो. अशावेळी क्रीम्स आणि इतर कोणती निरुपयोगी औषधे घेण्याने त्यातील रासायनिक घटकांचा चेहऱ्यावर दुष्परिणाम होतो म्हणून त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मिराज क्लिनिकमधील त्वचा तज्ञांकडून कार्बन पील फेशियलने स्कीन टेक्शर मुलायम होते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या फेशियलचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. सद्यस्थितीत प्रवास, कामाचे टेंशन, जागरण, खाण्यातील बदल आणि अनियमितपणा टाळणे अशक्य आहे. दिनक्रमातील हे बदल मग चेहऱ्यावर दिसू लागतात आणि अगदी तरुण वयात डोळ्याखाली त्वचा काळी पडून चेहरा निस्तेज वाटू लागतो. काळजी करण्याचे कारण नाही. मिराज क्लिनिकमधील कार्बन पील फेशियल ही चेहऱ्याला उजाळा देणारी संजीवनी आहे. या फेशियलची नेमकी पध्दत काय आहे? फेशियल करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून त्यावर विशिष्ठ प्रकारचा लेप पूर्ण चेहऱ्याला लावण्यात येतो. ठराविक वेळानंतर तो लेप उपकरणाच्या सहाय्याने काढला जातो. चेहऱ्याच्या अत्यंत सूक्ष्म रंध्रांमध्ये बसलेले धुलीकण, तेलकटपणा (चेहऱ्यातून बाहेर पडणारी शरीरातील अतिरिक्त चरबी, क्रीम्सच्या वापरामुळे तयार झालेला सूक्ष्म थर) या लेपनात खेचला जातो. लेअर निघाल्यामुळे चेह-याचे टेक्शर अगदी मुलायम होते. या फेशियलमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. उत्तम खात्रीशीर उपचाराने घेतलेली चेहऱ्याची काळजी म्हणजे सौंदर्य साधना आहे. त्यासाठीच मुंबईमधील अंधेरी वेस्टच्या सर्वोत्तम मिराज क्लिनिक मधील कार्बन पील फेशियल म्हणजे चेहऱ्याला उजाळा देणारी अनुभवसिद्ध संजीवनी.


Comments
avatar
Please sign in to add comment.